28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय मोदींच्या धोरणामुळे १४ कोटी बेरोजगार

मोदींच्या धोरणामुळे १४ कोटी बेरोजगार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : चीनसह भारतातून फरार झालेल्या उद्योगपतींच्या मुद्यावरून मोदी सरकारला घेरणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारविरोधात नवा नारा दिला आहे. युवक कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त युवक कॉंग्रेसने रोजगार दो अभियान सुरू केले आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेस रस्त्यावर उतरणार असून, या आंदोलनात देशवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.

युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त राहुल गांधी यांनी एक व्हीडीओ ट्विट केला आहे. या व्हीडीओतून राहुल गांधी यांनी देशवासीयांना काँग्रेसच्या नव्या अभियानाशी जोडण्याचे आवाहनही केले आहे. यात जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी देशातील तरुणांना प्रत्येक वर्षी २ कोटी लोकांना रोजगार देणार, असे खूप मोठे स्वप्न दाखवले होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या धोरणामुळे रोजगार मिळवणे तर दूर, उलट १४ कोटी लोकांना बेरोजगार बनवले. हे सगळे चुकीच्या धोरणांमुळे झालं आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाउन या तीन गोष्टींनी भारताच्या आर्थिक पायालाच संपवले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

आता सत्य हे आहे की, पंतप्रधान मोदी देशातील तरुणांना नोकरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर आली आहे. युवक काँग्रेस प्रत्येक तालुक्यातील रस्त्यावर उतरून हा मुद्दा उचलून धरणार आणि पूर्ण ताकदीने हा मुद्दा लावून धरणार आहे, याचा मला आनंद आहे. ‘रोजगार द्या’ अभियानात देशवासीयांनी सहभागी व्हावे आणि युवक काँग्रेससोबत मिळून देशातील तरुणांना रोजगार मिळवून द्यावा. मी युथ काँग्रेसचे अभिनंदन करू इच्छितो. आज युवक काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. सक्रिय राहा, देशातील तरुणांसाठी लढा द्या, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.

चुकीचे धोरण कारणीभूत
चुकीच्या धोरणांमुळे हे सर्व झाले. नोटाबंदी, चुकीचा जीएसटी आणि नंतर लॉकडाउन या ३ गोष्टींमुळे भारताची रचना, आर्थिक संरचना नष्ट केली. भारत आपल्या तरुणांना नोकरी देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. म्हणूनच युवक कॉंग्रेस मैदानात उतरत असल्याचे ते म्हणाले.

युवक काँग्रेसचे रोजगार दो अभियान
ळ९ ऑगस्ट १९६० रोजी युवक काँग्रेसची स्थापना झाली होती. आज युवक काँग्रेसचा ६० वा वर्धापनदिन असून, या निमित्ताने काँग्रेसने रोजगार दो अभियानाची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही हॅशटॅगसह ट्विट केले आहे. राहुल गांधीशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही व्हीडीओ ट्विट केले आहेत.

रुग्णांनी ओलांडला २१ लाखांचा टप्पा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या