26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये आणखी १४ जणांना झिकाची लागण

केरळमध्ये आणखी १४ जणांना झिकाची लागण

एकमत ऑनलाईन

कोच्ची : देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना आता झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. हा व्हायरस कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात, असे असले तरी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली असून, परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

केरळमध्ये सर्वात प्रथम एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितले जात आहे.

झिका विषाणूची लागण कशी होते?
एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गर्भातील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते.

झिका विषाणूची लक्षणे
ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणे आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. असे असले तरी सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचे सांगणे कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणे आवश्यक आहे.

खबरदारीचा उपाय
डास चावण्यापासू संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणं गरजेचं आहे. हा व्हायरस डासांमुळे पसरत असल्याने तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच डबकी ंिकवा घरात फार दिवस पाणी भरलेलनं राहणार नाही याची काळजी घ्या.

माहिती तंत्रज्ञानाला पीटीआयचे आव्हान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या