भोपाळ : ग्रामपंचायत निवडणुकीची आचासंहिता लागू होण्याच्या एक तास आधी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ग्रामपंचायतींसाठी एक कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली. मध्य प्रदेशमध्ये कोणत्याही ग्राम पंचायतीत जर सरपंचाची बिनविरोध निवड झाली तर ५ लाख रुपये, दुस-यांदा बिनविरोध निवड झाली तर ७ लाख, सरपंचासह सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर ७ लाख, सर्व सदस्य महिला असतील तर १२ लाख, सर्व महिला सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यास १५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.