21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयलक्षव्दिपमध्ये १५ नेत्यांचा भाजपला रामराम

लक्षव्दिपमध्ये १५ नेत्यांचा भाजपला रामराम

एकमत ऑनलाईन

लक्षद्विप : लक्षद्विपमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे १५ नेते आणि इतर कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर येत आहे. यामगील कारण असे सांगितले जाते आहे की, फिल्ममेकर आयशा सुल्ताना विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आयशा सुल्तानवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये फूट पडली असल्याचे सांगितले जात आहे.

लक्षद्विपची पहिली फिल्ममेकर झालेली आयशा सुल्तानावर कावारत्ती पोलिस ठाण्यात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. तिच्यावर गुन्हा दाखल होण्यामागे कारण असे होते की, लक्षद्विपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय आणि कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहून आयशाने टीका केलेली होती. यावर भाजपचे राज्य सचिव अब्दुल हामिद म्हणाले की, चेतलाथच्या बहिणीविरोधात खोटी आणि चुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही भाजपच्या पदांचा राजीनामा देत आहोत.

प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचा निर्णय जनविरोधी
भाजपच्या पदांचा राजीनामा देणा-यांमध्ये राज्य सचिव अब्दुल हामिन मुल्लीपुरा, वक्फ बोर्टाचे सदस्य उम्मुल कुलूस पुथियापुरा, खादी बोर्डाचे सदस्य सैफुल्ला पक्कियोडा, जाबिर सलीहथ मंजिल आणि इतर कार्यकर्त्यांचा सामावेश आहे. अब्दुल खादर यांनी भाजपमधील १२ नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीची एक पत्र पाठविण्यात आले आहे, त्यात असे म्हटले आहे की, प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णय जनविरोधी आणि लोकशाही विरोधात जाणारे आहेत. त्याला लोक आता कंटाळेले आहेत. अशा आशयाचे पत्र त्यांना भाजपकडे पाठविलेले आहे.

पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या