22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय रेल्वेच्या रूळांवर लवकरच धावतील १५० प्रायव्हेट प्रवासी ट्रेन्स- पियूष गोयल

भारतीय रेल्वेच्या रूळांवर लवकरच धावतील १५० प्रायव्हेट प्रवासी ट्रेन्स- पियूष गोयल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे (खाजगीकरणाकडे पुढे सरकतेय. रेल्वे आता १५० खाजगी प्रवासी रेल्वे (Train) सुरू करणार आहे. हे स्वत: रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारी उद्योग समूहाच्या सीआयआयच्या ऑनलाईन कार्यक्रमात सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, रेल्वे आता खाजगी क्षेत्रात १५० प्रवासी रेल्वे सुरू करणार आहे आणि या योजनेसाठी इंटरेस्टेड कंपन्यांना आमंत्रित केलं गेलंय. सोबतच गोयल यांनी सांगितलं की, रेल्वेमध्ये बिझनेससाठी मंत्रालय रेल्वे रूट आणि पार्सल गाड्यांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी तयार आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं की, खाजगी सेक्टर अनेक पद्धतीनं आपल्याला सहकार्य करू शकतं. मी नवीन रूट्ससाठी पट्टे देऊ शकतो, याचा अर्थ की, मी हे म्हणतोय की, प्रायव्हेट कंपन्या अशा रूट्सची निवड करावी, ज्यावर ते रेल्वे सुरू करू इच्छितात. त्यांनी सांगितलं की, रेल्वेमध्ये मालवाहतुकीचं काम गेल्या वर्षीच्या ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचलंय. त्यांनी सांगितलं की, जर आपल्याला हवे असेल तर आम्ही आपल्यासोबत नवीन रेल्वे लाईन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे. आम्ही ट्रॅफिक रूट्सवर पट्टे देण्यासाठी तयार आहे. आम्ही पार्यल ट्रेन्ससाठी पण पट्टे देऊ शकतो. म्हणून प्रायव्हेट सेक्टरसाठी खूप संधी आहेत. रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, प्रायव्हेट सेक्टरचं नॅशनल हायवेसोबतच एक एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याचा विचार करत आहोत, कारण यात जमीन अधिग्रहणाचं आव्हान नसेल.

रेल्वेमंत्री पुढे हे पण म्हणाले की, रविवारी रेल्वेनं गेल्या वर्षी २१ जूनच्या तुलनेत जवळपास ९५ टक्के माल वाहून नेण्यास समर्थ झालो. त्यांनी पुढे सांगितलं की, तर आपण २१ जून २०१९ च्या तुलनेत अवघ्या ५ टक्क्यांनी खाली होतो. जर आपण संपूर्ण जून महिना पाहिला तर, माल वाहतुकीच्या बाबतीत आपण १ जून ते २१ जून दरम्यान जवळपास ८ टक्के खाली आहोत. मला वाटतं की, जुलैपर्यंत आपण याबरोबरीत येऊ आणि ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत यात वाढ होण्याची आशा करू शकतो. मालगाडीच्या सरासरी स्पीडबाबत बोलतांना रेल्वेमंत्री म्हणाले, २१ जूनला ही २२.९८ किमी प्रति तास होती आणि रविवारी ४१.७४ किमी प्रति तास याची स्पीड होती.

Read More  शिक्षणमंत्री उदय सामंत : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सीईटीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

गोयल पुढे म्हणाले की, खूप काळापासून अशा वेळेच्या प्रतिक्षेत होतो, जेव्हा अनेक इंटरकनेक्ट लाईन्सचं काम करण्यासाठी वेळ मिळेल. लॉकडाऊनमुळे मिळालेला भरपूर वेळेचा सदुपयोग केला गेलाय. तसंच रेल्वे टाईमटेबलनुसार वेळेवर धावण्यासाठीही प्रयत्न केला गेला. आम्ही माल आणि पार्सल ट्रेन्स टाईम टेबलनुसार आणत आहोत. जेणेकरून आम्ही माल कमी वेळात दूरवर डिलिव्हर करू शकतोय. पुढे जावून मंत्रालय माल वाहतूक स्वस्त करेल, अशी अपेक्षा सुद्धा रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली.

रेल्वेमंत्री पियूष गोयल म्हणाले, रविवारपर्यंत भारतीय रेल्वेनं ४,५५३ कामगार स्पेशल ट्रेन्स चालवल्या आणि आता याची संख्या कमी होतेय. ३१ मे ते २१ जूनपर्यंत ही संख्या १० टक्क्यांनी कमी झालीय. काल (रविवारी) फक्त तीन अशा ट्रेन्स चालवल्या गेल्या. याची मागणी आता संपतेय. आम्ही सर्व प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवलंय, जे आपल्या मूळ गावी जावू इच्छित होते. आतापर्यंत या ट्रेन्सद्वारे ७५ लाख प्रवासी मजुरांनी प्रवास केलाय. तर आता रेल्वेनं आपल्या नियमित रूट्सवर २३० ट्रेन्स सुरू केल्याय. ज्या पूर्ण भरून सध्या जात नाहीय, कारण नागरिक आता प्रवास करणं टाळत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या