30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयदेशात २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

देशात २४ तासांत १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. प्रचंड वेगाने वाढणा-या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात १,५२,८७९ जणांना करोनाची लागण झाल्याची समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीचा विजय, चेन्नईला धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या