26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयदेशात १६,३२६ नवे रुग्ण

देशात १६,३२६ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे नवे १६ हजार ३२६ रुग्ण आढळले असून ६६६ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७२८ इतकी झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली.

केरळमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या २७ हजार ७६५ इतकी झालीय. हा आकडा केरळने मागील आकडेवारीतील ५६३ मृत्यू समाविष्ट केल्यानंतर झालेत. २१ ऑक्टोबरला केरळ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोना मृत्यूंची एकूण संख्या २७ हजार २०२ इतकी होती. शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) ९९ मृत्यूंची नोंद झाली.

याशिवाय पुरेशा कागदपत्रांअभावी आकडेवारीत समाविष्ट करायचे राहिलेले १४ जून २०२० पर्यंतच्या २९२ मृत्यूंचाही समावेश एकूण आकडेवारीत करण्यात आला. तसेच नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार १७२ मृत्यूंचा समावेश कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आला. यासह केरळमधील एकूण मृतांची संख्या २७ हजार ७६५ झाली आहे, अशी माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या