24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयदेशातील १७ राज्ये वायू प्रदूषणाविरोधात कृती आराखड्याविनाच

देशातील १७ राज्ये वायू प्रदूषणाविरोधात कृती आराखड्याविनाच

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशातील अनेक नागरिकांना या हिवाळयामध्येदेखील श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागला होता. कारण देशातील १७ राज्यांमध्ये वायू प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती पुढे आली असून हे वायू प्रदूषण असेच वाढले तर आणखी आजार उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही.

लिगल इनिशिएटीव्ह फॉर फॉरेस्ट आणि एनवार्यमेंट (लाईफ) या संस्थेने आरटीआयअंतर्गत मागविलेल्या माहितीचे विश्लेषण केले आहे. हवेची गुणवत्ता राखण्यासाठी गेल्या २०१९ ला नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम देशातील १०२ प्रदूषित शहरांमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाअतंर्गत अजूनही अनेक राज्यांमध्ये कृती आराखडा आणि त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने देखील याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी काहीच केले नाही. तसेच शहराच्या स्तरावर हे करण्यात आले. मात्र, त्यात वैज्ञानिक दृष्टीकोण नसल्याचे समोर आले, असेही आरटीआयच्या अहवालामध्ये सांगितले आहे.

नियोेजीत मर्यादा संपूनही आराखडा नाही
१७ राज्यांमध्ये २०२० शेवटची तारीख असूनही अद्यापही वायूप्रदूषण कमी करण्याच्या बाबतीत कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही. कृती आराखडा तयार करावा लागणार याबाबत अनेक राज्य सतर्क नसल्याचेही या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे.

आराखड्यासाठी केली चक्क शहरांची नकल
शहरानुसार पाहायला गेले तर गाझियाबाद आणि नोएडा या दोन्ही मोठया शहरांसाठी सारखाच कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. म्हणजेच विशेष एकाच शहरामध्ये होणाºया प्रदूषणाचा यामध्ये विचार करण्यात आला नाही. तसेच महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग असल्याने वायूप्रदूषण होते. त्यामुळे पुणे शहराची हवा देखील प्रदूषित होते. तरीही कृती आराखड्यामध्ये ही समस्या मांडण्यात आली नाही, असेही या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे.

अजूनही सावधगिरी नाही
या सर्व गोष्टीवरून असेच दिसून येते की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि राज्य सरकार हे प्रदूषण कमी करण्याच्या कृती आराखड्याबाबत अजूनही सावध झालेले नाही. गेल्या अडीच वर्षामध्ये एनसीएपीच्या अंमलबजावीबाबत काय झालं? हे प्रत्येक राज्यात जाऊन तपासणे गरजेचे आहे, असे लाईफचे व्यवस्थापकीय विश्वस्त रित्विक दत्ता म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या