22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयदेशात १९९७ नवे बाधित

देशात १९९७ नवे बाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत १९९७ रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत ५०३ रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

देशात काल २५०० नव्या रुग्णांची नोंद झाली होती. इतकेच नाही तर मे महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. या आधी २३ मे २०२२ रोजी १६७५ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची मोठी घट झाली आहे. देशात सध्या ३० हजार ३६२ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. काल ही संख्या ३२ हजार २८२ इतकी होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या