16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयतिरुपती संस्थानची मालमत्ता २.२६ लाख कोटी

तिरुपती संस्थानची मालमत्ता २.२६ लाख कोटी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : तिरुमला तिरुपती देवस्थानमने प्रथमच रविवारी मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली. संस्थाने श्वेतपत्रिका जारी करीत याची माहिती दिली. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मंदिराचे ५३०० कोटी रुपयांचे १०.३ टन सोने आणि १५,९३८ कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले. मंदिराची एकूण मालमत्ता २.२६ लाख कोटी आहे.

सोने आणि रोखीत २०१९ पासून वाढ
ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्याच्या ट्रस्ट बोर्डाने २०१९ पासून गुंतवणूक गाईडलाईन सशक्त केली आहे. संस्थानची २०१९ मध्ये अनेक बँकांमध्ये १३,०२५ कोटी रोकड होती. ती वाढून १५,९३८ कोटी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीत २,९०० कोटी रुपयांची वाढ झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे २०१९ मध्ये ट्रस्टच्या शेअर्ड बँक-वायस गुंतवणुकीत ७३३९.७४टन सोन्याच्या ठेवी होत्या. ज्यात गेल्या तीन वर्षांत २.९ टनांनी वाढ झाली.

मंदिर संस्थानचा विस्तार ७,१२३ एकरांत
तिरुपती- तिरुमला संस्थानचा विस्तार हा ७१२३ एकरांत आहे. देणगीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून याची ओळख आहे. या ठिकाणी संस्थानच्या एकूण ९६० मालमत्ता आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या