23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीय१५ दिवसांत २.३६ कोटी ध्वजांची ऑनलाईन खरेदी

१५ दिवसांत २.३६ कोटी ध्वजांची ऑनलाईन खरेदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सार्वजनिक खरेदीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म जीईएमवर १ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान विविध सरकारी विभाग आणि राज्यांनी ६० कोटींहून अधिक किमतीचे २.३६ कोटी राष्ट्रध्वज खरेदी केले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार हर घर तिरंगा मोहिमेसाठी हे ध्वज खरेदी करण्यात आले आहेत.

सरकारी खरेदीदारांसाठी खुले आणि पारदर्शक खरेदी मंच तयार करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने ९ ऑगस्ट २०१६ रोजी सरकारचे ई-मार्केटप्लेस (ॠीट) लाँच केले. केंद्र आणि राज्य मंत्रालये, विविध विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्था यासारख्या सर्व सरकारी खरेदीदारांकडून या प्लॅटफॉर्मवर खरेदी केली जाते.

ई-मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), पीके सिंग, म्हणाले, ह्लएक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असल्याने, ॠीट ला विक्रेत्यांना वेगाने जोडणे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या मोठ्या गरजा पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणतीही खरेदी झाली नव्हती. ते म्हणाले, ह्लखरेदी प्रक्रिया सुरळीत व्हावी आणि वेळेवर वितरण व्हावे यासाठी आम्ही खरेदी युनिट्सशी सतत संवाद साधत होतो.

22 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा फडकवून हर घर तिरंगा मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले होते. जीईएम प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय ध्वज विक्रीसाठी तब्बल 4,159 विक्रेत्यांनी नोंदणी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या