नवी दिल्ली : देशात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात देशात २ हजार ३६४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात १ हजार ८२९ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ३३ जणांचा मृत्यू झासा होता.
आज त्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ४१९ वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपेक्षा आज आढळलेली रुग्णसंख्या ही जास्त आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासानू कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. ज्याकडे कोरोनाची पुढची लाट म्हणून पाहिले जात आहे.