27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयपाककडून २० भारतीय मच्छिमारांची सुटका

पाककडून २० भारतीय मच्छिमारांची सुटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तानने २० भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे. वाघा-अटारी बॉर्डर ट्रान्झिट पॉइंटवरून या मच्छिमारांना भारतात पाठविण्यात आले आहे. पाकिस्तानने २० भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. या मच्छिमारांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली असल्यामुळे त्यांना मायदेशात परत पाठवले आहे असे ट्विट उच्चायुक्तांनी केले आहे.

उच्चायुक्त म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून हे मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात होते. हे सर्व मच्छिमार गुजरातचे रहिवासी आहेत. पाकिस्तानमध्ये या मच्छिमारांवर न्यायालयीन खटला चालवण्यात आला आणि त्यांना पाकिस्तानमध्ये ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

प्रसारमाध्यमांनी एका मच्छिमाराशी संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, आम्ही चार वर्षांनी परत येत आहोत. पाकिस्तानात अडकलेल्या भारतीयांचीही सुटका झाली पाहिजे. या मच्छिमारांची शिक्षा संपल्यानंतर पाकिस्तानने त्यांना भारतात परत पाठवले आहे. ते अटारी सीमेवरून भारतात दाखल झाले. भारतात परतलेल्या सर्व मच्छिमारांची तपासणी केल्यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांना गुजरातमध्ये प्रवेश दिला, अशी माहिती अधिका-यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या