आसाम भूस्खलनात २० ठार, ९ गंभीर

- तीन ठिकाणी घटना, संततधार पाऊस सुरूच

381

गुवाहाटी: वृत्तसंस्था
गत दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे आसाममधील तीन भागात भूस्खलनामुळे २० जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पावलेल्यांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघाताच्या घटना दक्षिण आसाम, काचार, हैलाकांडी आणि करीमगंज या तीन जिल्ह्यात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भीषण दुर्घटनांमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश आहे. मंगळवारी पहाटेच्या वेळी, लोक घरात झोपले असताना हे भूस्खलन झाले. झोपलेले असल्याने भूस्खलनातून लोकांना वाचता आले नाही. यात लोकांची घरे उध्वस्त झाली असून संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला.

Read More  पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह : वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांवर गुन्हा

संपूर्ण कुटुंब जिवंत पुरले गेले
मंगळवारी पहाटे करीमगंज जिल्ह्यातील कालीगंज भागात ही दरडी कोसळली. हा परिसर बांगलादेश सीमेला जोडलेला आहे. येथे डोंगराच्या ढिगाºयाखाली सहा जण गाडले गेले. मृतांपैकी सहा जणांपैकी पाच जण एकाच कुटुंबातील होते. घटनेच्या वेळी ते घरामध्ये झोपले होते. या दुर्घटनेत घरातील सर्वजण जिवंत पुरले गेले.

क्षणात घर जमीनदोस्त
दुसरी घटना काचार जिल्ह्यातील कोलापूर गावात घडली. येथे दरड कोसळून सात जणांना मृत्यू झाला. मरण पावलेल्यांमध्ये ही तीन कुटुंबांतील लोकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. मरण पावलेली सर्व माणसे त्यावेळी घरी झोपली होती. डोंगराचा एक मोठा भाग तुटून तो घरावर कोसळला आणि काही क्षणातच ते घर नष्ट झाले.

चार मुलांचा समावेश
तिसरी घटना हैलाकांडी जिल्ह्यात घडली. येथील भटाटबाजार गावात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते. या सात लोकांपैकी सहा जण एकाच कुटुंबातील होते. तर, या सहा जणांमध्ये ४ मुलांचा समावेश आहे. जेव्हा मृतदेह ढिगाºयाबाहेर काढले गेले तेव्हा मृत्युमुखी पडलेली मुले पाहून सर्वांना धक्का बसला.

मुसळधार पाऊस सुरूच
बंगालच्या उपसागरातून दक्षिण-पश्चिम वाºयाचा जोरदार प्रवाह आणि इतर भौगोलिक कारणांमुळे आसाममध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बºयाच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ईशान्य भारतात सर्वाधिक पाऊस मे आणि त्यानंतर जूनमध्ये होतो.