26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये २०० किलो ड्रग्ज जप्त

गुजरातमध्ये २०० किलो ड्रग्ज जप्त

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली असून २०० किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गिअर बॉक्समध्ये लपवून दुबईहून हे ड्रग्ज भारतात आणले जात असताना गुजरात एटीएस आणि डीआरआयने ही कारवाई केली आहे. हे ड्रग्ज फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकत्ता येथे आणण्यात आले होते. त्यानंतर राबवलेल्या तपासात ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, तब्बल १२ गिअर बॉक्समध्ये हे ड्रग लपवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. दुुबईच्या जेबेल अली पोर्टवरून हे ड्रग पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून सहा महिन्याच्या तपासानंतर यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २०० किलो ड्रग गुजरात एटीएसने ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या