25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयबांगलादेशला २०० टन मेडिकल ऑक्सिजन पोहोचवणार

बांगलादेशला २०० टन मेडिकल ऑक्सिजन पोहोचवणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बांगलादेशात कोरोनाव्हायरसचा कहर पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट तिथे वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तेथील सरकारने शुक्रवारी २३ जुलै रोजी १४ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला. दरम्यान, बांगलादेशच्या मदतीसाठी भारतीय रेल्वे पुढे आली आहे.

बांगलादेशला मदत करण्यासाठी, भारतीय रेल्वे रविवारी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेनमार्फत २०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची डिलिव्हरी करेल. असे पहिल्यांदाच घडत आहे की, हा जीव वाचवणारा गॅस देशाबाहेर पाठविला जात आहे. शनिवारी झारखंडमधील टाटानगरहून निघालेली ही १० डब्यांची रेल्वे रविवारी बांगलादेशच्या बेनापोल येथे पोहोचेल. रेल्वेने सांगितले की, टाटानगरहून २०० मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस पहिल्यांदाच बांगलादेशला रवाना झाली. उद्या सकाळी ही रेल्वे तिथे पोहोचण्याची शक्यता आहे.

२४ एप्रिलपासून सुरू झाली ऑक्सिजन एक्स्प्रेस
भारतातील कोरोना साथीच्या दुस-या लाटेदरम्यान, रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेसचे काम राज्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सुरू केले. २४ एप्रिल २०२१ रोजी ही मोहीम सुरू झाल्यापासून रेल्वेने अशा ४८० गाड्या चालवल्या आहेत आणि देशाच्या विविध भागात ३८,८४१ टन ऑक्सिजन डिलिव्हरी केला आहे.

जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या