24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीय‘प्रत्येकाला लस’ यासाठी २०२४ उजाडणार!

‘प्रत्येकाला लस’ यासाठी २०२४ उजाडणार!

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना लसीची थांबलेली चाचणी सुरू झाली असली, तरी लसनिर्मितीची प्रक्रिया सोपी नाही. प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला २०२४ सालची अखेर उजाडेल, असे खुद्द सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रमुखांनीच स्पष्ट केले आहे. पुनावाला यांच्या या खुलाशामुळे लवकरच कोरोनाची लस बाजारात येईल, या आशेवर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी भारतातील सगळ्या लोकांपर्यंत लस पुरविण्याबाबतही शंका व्यक्त केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी जगाच्या लोकसंख्येचा विचार करता लसनिर्मिती करणा-या फार्मा कंपन्या एवढी निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या नाहीत. त्यामुळे या कंपन्या कमी कालावधीत संपूर्ण जगभराला लस पुरवू शकत नाहीत, असे म्हटले. पृथ्वीवरील सर्व लोकांना लस पुरविण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे ते म्हणाले. सीरम ही कोरोनाच्या लसनिर्मितीतील मोठी संस्था मानली जाते. अस्ट्राझेनेका आणि नोव्हावॅक्स यांच्यासह जगभरात पाच संस्था मिळून लसीचे १०० कोटी डोस निर्माण करण्यात येत आहेत. यातील निम्मे डोस भारतासाठी असतील, असेही पुनावाला यांनी सांगितले. मात्र, प्रत्येकांपर्यंत लस पोचवायला वेळ लागणार, असे ते म्हणाले.

एक तर जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचण्यासाठी किमान पाच वर्षे लागू शकतात आणि त्यातच कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागणार असतील, तर १५ अब्ज डोस आवश्यक आहेत, असेही पुनावाला यांनी सांगितले. रोटाव्हायरस, कांजिण्या आदी रोगांवरच्या लसी अशाच दोन डोस घेतल्याशिवाय उपयुक्त ठरत नाहीत. आता रशियाने निर्माण केलेल्या स्पुटनिक लसीसाठी रशियाच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटशी करार करण्याचाही सीरम इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या पद्धताने लसनिर्मितीच्या कामाला वेग येऊ शकतो, असे आदर पुनावाला म्हणाले.कोरोना लस पुढच्या महिन्यात येणार, लस आली की मगच शाळा सुरू होणार वगैरे आशेवर पुनावालांच्या स्पष्टोक्तीमुळे विरजण पडले आहे.

प्रयत्न जोरात, तथापि महिनाभरात लस अशक्य
लसनिर्मितीच्या प्रक्रियेत असलेली कुठलीही संस्था किंवा कंपनी महिन्याभरात गरजू व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याच्या टप्प्यापर्यंत आलेली नाही. सगळ््या जगाला कोरोना लसीकडून आशा आहे. अनेक जागतिक नेत्यांनी लसनिर्मितीची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी सर्व जोर लावला आहे आणि पुढच्या काही दिवसांत लस येईल, म्हणून प्रीबुकिंगही केले आहे. पण खोटी आश्वासने देण्यात अर्थ नाही. मला नाही वाटत कुठलीही संस्था याच्या जवळपासही आहे, असे पुनावाला म्हणाले.

भारतात कोल्ड स्टोरेजचा अभाव
आदर पुनावाला यांनी भारतातील १.४ अब्ज लोकांपर्यंत लस पुरविण्यासाठी चिंता व्यक्त केली आहे. कारण लसीच्या वाहतुकीसाठी आणि वितरणासाठी कोल्ड चेन सिस्टिम उपलब्ध नाही. लस तयार केल्यांतर कमी तापमानाच्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवावी लागते. एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी कोल्ड सिस्टिम असणे गरजेचे असते, असे म्हटले. भारतात ४० कोटींपेक्षा जाज्स लोकांना लस देता येऊ शकेल, अशी कोणतीही योजना नाही. उत्पादन केल्यानंतर साठवून ठेवण्याची समस्या उद्भवू शकते, असेही ते म्हणाले.

समाजाभिमुख अभियंता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या