28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय 2060 जागा रिक्त : पोस्ट खात्यात 10 वीच्या गुणांवर उमेदवारांची निवड

2060 जागा रिक्त : पोस्ट खात्यात 10 वीच्या गुणांवर उमेदवारांची निवड

एकमत ऑनलाईन

पोस्ट खात्यामध्ये (India Post) मोठ्या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिसा पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण पोस्टमन या पदासाठी ही भरती काढली आहे. यानुसार 2060 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Odisha Postal Circle GDS Recruitment 2020: ग्रामीण पोस्टमनच्या 2060 जागा रिक्त आहेत. या पदासाठी 10000 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांना गणित, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. वय 18 ते 40 वर्षे निर्धारित करण्यात आले आहे.

अंतिम दिनांक 30 सप्टेंबर
ऑनलाईन अर्ज : 1 सप्टेंबरपासून नोदणीला सुरुवात. अंतिम दिनांक 30 सप्टेंबर राहणार आहे.

उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार : सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाच्या पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तर एससी, एसटी वर्गातील महिला उमेदवारांना शुल्क नाही. हे शुल्क हेड पोस्ट ऑफिस किंवा नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करता येणार
वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी www.appost.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी. 10 वीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

…म्हणून गावक-यांनी तिचे लग्न दिरा सोबत लाऊन दिले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या