21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीययोजनेच्या ३० हजारांसाठी २१ महिला झाल्या विधवा

योजनेच्या ३० हजारांसाठी २१ महिला झाल्या विधवा

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथे भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणाच वाढला की, अवघ्या ३० हजारांसाठी तब्बल २१ महिलांना विधवा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

उत्तर प्रदेशातील सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंब प्रमुखाचा ६० वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ३० हजार रुपयांचा मदत निधी दिला जातो. या योजनेत अधिकारी आणि दलालांनी भ्रष्टाचार केला आणि गरीब विधवा महिलांना दिल्या जाणा-या ३० हजार रुपये बळकावले. चित्रकूट, बलरामपूर, गोरखपूर, कानपूर या योजनेत घोटाळ्याबाबत यापूर्वी तक्रार दाखल केली आहे. नुकतच प्रकरण लखनौ येथून समोर आले आहे़ येथे २१ खोट्या लाभार्थ्यांची यादी समोर आली आहे. ज्या महिलांचे पती जिवंत असतानाही त्यांना मृत असल्याचे घोषित केले आणि त्यातून मिळालेला लाभ अधिका-यांच्या खिशात गेला.

महिलांना १५ हजार तर उर्वरित अधिका-यांना
लखनौच्या सरोजनी नगर भागातील बंथरा आणि चंद्रावल गावात २०१९-२० आणि २०२०-२१ या दरम्यान एकूण ८८ कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाल्याचे दाखविण्यात आले आहे. सुरुवातीच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी २१ महिलांचे पती जिवंत आहेत. या खोट्या मदत निधींतर्गत भ्रष्ट अधिकारी आणि दलालांचे कमिशन ठरवलेले असते. लाभार्थी महिलांना ३० पैकी १५ ते २० हजार रुपये दिले गेले. यानंतर स्थानिक जिल्हा प्रशासनाने अशा कर्मचा-यांचे निलंबन केले आहे.

सीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या