29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयकिराणा मालाच्या किमतीत २२ टक्क्यांवर वाढ

किराणा मालाच्या किमतीत २२ टक्क्यांवर वाढ

एकमत ऑनलाईन

महागाईचा सर्वसामान्यांना फटका
नवी दिल्ली : सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नानंतरही सामान्य माणसाला महागाईतून दिलासा मिळताना दिसत नाही. रिटेल अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म बिजोमच्या मते या वर्षी जानेवारीपासून ते आतापर्यंत रोज वापरात असलेल्या किराणा मालाची किंमत १० ते २२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. यात खाद्यतेल, मसाले आणि तांदळापासून ते केसांना लावणा-या तेलापर्यंतचा समावेश आहे. तसे तर साबण आणि वॉशिंग पावडर यासारख्या वस्तूंच्या किमती १ ते ३ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत किमती वाढल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती घटल्या. मात्र जानेवारीच्या तुलनेत आतादेखील ५ ते २२ टक्के महाग आहेत. दरम्यान, मसाल्यांच्या किमतीदेखील ३ ते १७ टक्के वाढल्या आहेत. ही स्थिती आताची आहे, जेव्हा भारत जगातील सर्वात मोठ्या मसाला निर्यातदारांपैकी एक आहे. एवढेच नव्हे तर या वर्षी आतापर्यंत तांदूळ, पीठ आणि रिफाइंड फ्लोरसारखे ब्रँडेड आवश्यक किराणा सामानाचे भावदेखील १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. बिजोमच्या अहवालात सांगण्यात आले की, दर वाढल्याने किराणा मालाच्या विक्रीवर परिणाम होत आहे.

किमती कमी होणार?
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठी झळ सहन करावी लागत आहे. अर्थात, संपूर्ण आर्थिक बजेटच कोलमडून गेले आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा साबण-तेलासारख्या रोज लागणा-या वस्तू बनवणा-या दिग्गज कंपनी मेरिकोच्या एमडी सौगत गुप्ता यांनी सांगितले. त्यामुळे किमान काही वस्तूंच्या तर किमती कमी होतील, अशी आशा आहे.

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या