22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयकरसंकलनात २३ टक्के वाढ

करसंकलनात २३ टक्के वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना महासाथ संपल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत असून, उद्योग, सेवा क्षेत्रात वाढ होत आहे. त्यातच देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रत्यक्ष कर संकलन दिवसेंदिवस वाढत असून चालू आर्थिक वर्षात हा आकडा ७ लाख कोटींच्या पुढे पोहोचला आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. भारत सरकारच्या धोरणांमुळे कर संकलनात वाढ होत आहे. तसेच कर आकारणी पद्धतीला आणखी साधे, सरळ आणि सोपे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. करगळती थांबविण्याठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यास मदत होत आहे, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १७ सप्टेंबर २०२२ पयर्Þंत ७ लाख ६५९ कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले. मागील आर्थिक वर्ष २०२१-२२च्या तुलनेत हे करसंकलन २३ टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये कॉर्पोरेशन कर (३ लाख ६८ हजार ४८४ लाख कोटी रुपये) आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (३ लाख ३० हजार ४९० लाख कोटी) तसेच वैयक्तिक आयकर यांचा समावेश आहे. याच काळात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५ लाख ६८ हजार १४७ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या