30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीय२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा!

२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमाणावर वाढत असणा-या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या शहरांमधील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेची समस्या उभी राहिली असून, ऑक्सिजनची निर्मिती आणि वाहतूक २४ तास बिनदिक्कत करावी तसेच, ऑक्सिजन पुरवठासंदर्भात आरोग्य मंत्रालयांनी सर्व राज्यांसोबत योग्य समन्वय आणि ताळमेळ राखण्याचे निर्वाणीचे आदेश शुक्रवार दि़ १६ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजन पुरवठासंदर्भातील बैठकीप्रसंगी दिले़

ऑक्सिजनचा बेड वेळेवर उपलब्ध न झाल्याने देशात अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यावर उपाय काढण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील मदत मागितली आहे. आता यासंदर्भातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरिय बैठक घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, देशात आवश्यक त्या प्रमाणात मेडीकल ग्रेड ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली. आरोग्य, डीपीआयआयटी, स्टील, रोड ट्रान्सपोर्ट या मंत्रालयांकडून देखील मोदींना माहिती पुरवली गेली. त्यांनी मंत्रालये आणि राज्य सरकारच्या दरम्यान ताळमेळ असायला हवा, यासाठी जोर दिला.

ट्रान्सपोर्ट कंपन्यांना निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य मंत्रालयासह अन्य विभागांची आपत्कालीन बैठक घेत २४ तास ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतूक करण्याचे निर्देश दिले. ट्रान्सपोर्ट कंपन्यांना ऑक्सिजनची वाहतूक करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये. चालकांची शिफ्टमध्ये ड्यूटी लावून २४ तास तयार राहण्याचे निर्देश द्यावेत. तसेच सिलिंडर भरणा-या प्लांटनीही २४ तास काम करण्यास परवानगी आहे. आरोग्य मंत्रालय, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयासह अन्य मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष उभारा
वैद्यकीय उपचारांसाठी वापराला जाणारा ऑक्सिजन नियोजनपूर्वक, योग्य पद्धतीने वापरा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिला आहे. तसेच ऑक्सिजन नियमित आणि सुरळीत पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याची तक्रार विविध राज्ये करीत आहेत. त्यानंतर आता ऑक्सिजनच्या कमतरतेची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा खुलासा केला आहे. ऑक्सिजन निर्मिती करणा-या प्रकल्पांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे सध्या त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. देशात पूर्ण क्षमतेने रोज ऑक्सिजन निर्मिती सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्सिजनची गरज वाढणार
महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमीळनाडू, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये ऑक्सिजनचा वापर सर्वाधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा वापर वाढणार असून, राज्यांच्या गरजेप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणार आहे. याचा विचार केला, तर सध्याच्या देशातील साठा ५० हजार मेट्रिक टनांहून अधिक आहे.

ऑक्सिजन आयात करणार
केंद्र सरकारने ऑक्सिजन सिलिंडरची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा जास्त फटका बसलेल्या जगभरातील अनेक देशांनी ऑक्सिजनची आयात करण्यास सुरवात केली आहे, त्यामुळेही ऑक्सिजनला मागणी वाढली आहे. देशात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, वैद्यकीय उपचारांसाठी वापराला जाणारा ऑक्सिजन नियोजनपूर्वक, योग्य पद्धतीने वापरा असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना दिला होता.

देशात २४ तासांत २१७३५३ नवे रुग्ण; ११८५ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या