25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयकर्नाटकात २४ रुग्णांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू

कर्नाटकात २४ रुग्णांचा ऑक्सीजनअभावी मृत्यू

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दररोज ओरड होत असून, देशात कुठे ना कुठे रुग्णांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. कर्नाटकातही दिरंगाईमुळे मृत्यूचे तांडव बघायला मिळाले. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने कर्नाटकमधील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयातील २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांत कोरोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे. ही घटना काल मध्यरात्री घडली.

बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. मात्र, ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपत्कालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर म्हैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात न आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात कोरोनाबाधित रुग्णही आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकांश रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सीजन पुरवठा थांबल्यानंतर हे रुग्ण तडफडू लागले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी सांगितले की, चामराजनगर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. मी म्हैसूर, मंड्या आणि चामराजनगर येथे जात आहे. तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेईन आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी कलबुर्गी येथील केबीएन रुग्णालयात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. यासोबतच मागच्या आठवड्यात राज्यात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.

परमबीर सिंगांनी बुकीकडून उकळले ३.४५ कोटी रुपये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या