34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयमालवाहतुकीच्या भाड्यात २५ टक्के वाढ

मालवाहतुकीच्या भाड्यात २५ टक्के वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रसरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कृषिभार लागू केल्याने देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरांनी आकाशाकडे झेप घेतली आहे. सर्वच क्षेत्रात महागाईत वाढ होत आहे. मंगळवारी अखिल भारतीय वाहतुकदार मदत संघटनेने दिलेल्या माहितीनूसार डिझेलच्या दरातील वाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात २५ टक्के वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांनाही सर्वच जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.  देशात सध्या डिझेलच्या दरांनी सर्वकालिन उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढता इंधनखर्चामुळे जनसामान्यांना जगणे महाग झाले आहे. अशातच आता मालवाहतुकीचे दर वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.

अखिल भारतीय वाहतुकदार मदत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी सर्वच प्रकारच्या मालवाहतुकीच्या भाड्यांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. एवढेच नव्हे सध्या वाहतुकीच्या क्षेत्रातही मोठी स्पर्धा असल्याने ग्राहकांना वाजवी मालभाड्यामध्ये आकर्षित करण्याच्या नादात वाहतुकदारांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. तसेच मालाची पोच वेळेत होणे अवघड बनले आहे.

सहामाही व वार्षिक करार करण्याची आमच्याकडे पद्धत असते. त्यामुळे माल आमच्याकडे दिला असेल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यास ग्राहकाकडूनही जास्तीचे भाडे आकारता येत नाही. परिणामी आमच्या व्यवसायातील शाश्वततेलाच बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशभरात डिझेल दर सारखेच हवे
सध्याच्या परिस्थितीमुळे मालवाहतुकीच्या व्यवसायावरच संकट आले आहे. एका राज्यात डिझेलचा दर वेगळा तर दुसरीकडे वेगळा, त्यामुळे तोटा होत आहे. दुसरीकडे डिझेलच्या दरात वाढीमुळे सर्वच प्रकारची महागाई वाढणार आहे. ही खूप गंभीर समस्या असून सर्व सरकारांनी देशभरात एकाच दरात डिझेल मिळेल, असे धोरण राबविण्याची गरज असल्याचेही सिंघल यांनी सांगितले.

फास्टॅगमुळे वार्षिक २० हजार कोटींची बचत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या