20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयजीएसटी संकलनात २६ टक्के वाढ

जीएसटी संकलनात २६ टक्के वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जीएसटी कर संकलनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा सात महिन्यातील उच्चांकी पातळी गाठली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन १,४७,६८६ कोटी रुपये होते. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २६ टक्के अधिक आहे.

जीएसटी करसंकलनात पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन १,४७,६८६ कोटी रुपये नोंदवण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २६ टक्के वाढ झाली आहे. या संकलनामध्ये सीजीएसटी रु. २५,२७१ कोटी, एसजीएसटी रु. ३१,८१३ कोटी, आयजीएसटी रु. ८०,४६४ कोटी आणि उपकर रु. १०,१३७ कोटी रुपयांचा समावेश आहे. हा सलग सातवा महिना आहे की जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

मार्च २०२२ पासून जीएसटी संकलन सातत्याने १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते. त्यानंतर मे २०२२ मध्ये १.४१ लाख कोटी रुपये,जून २०२२ मध्ये १.४४ लाख कोटी रुपये, जुलै २०२२ मध्ये १.४९ लाख कोटी रुपये आणि ऑगस्ट २०२२ मध्ये १.४३ लाख कोटी रुपये होते.

यासह,सप्टेंबरमध्ये १.१ कोटीहून अधिक ई-वे बिले आणि ई-चलान तयार करण्यात आले. यामध्ये ७२.९४ लाख ई-चालान आणि ३७.७४ लाख ई-वे बिलांचा समावेश आहे. २० सप्टेंबर रोजी ४९,४५३ कोटी रुपये जमा झाले. यापूर्वी ५७,८४६ कोटींचे संकलन झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या