26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमाजी मंत्र्यांच्या २६ ठिकाणांवर छापे, ७ आमदार ताब्यात

माजी मंत्र्यांच्या २६ ठिकाणांवर छापे, ७ आमदार ताब्यात

एकमत ऑनलाईन

चेन्नई : तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये माजी राज्यमंत्री एसपी वेलुमणी यांच्या घरावर डीव्हीएसी म्हणजेच, दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने छापा टाकला आहे. माजी राज्यमंत्री वेलुमणी यांच्याशी संबंधित आरोपांसंदर्भात डीव्हीएसी कोईम्बतूरसह २६ ठिकाणी शोध घेत आहे.

माजी मंत्र्यावर आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून आपल्या जवळच्या सहकारी कंपन्यांना अन्यायकारकपणे निविदा दिल्याचा आरोप आहे. एआयएडीएमकेचे कार्यकर्ते वेलुमणींच्या घराजवळ उपस्थित असून मंत्र्यांवरील या कारवाईचा निषेध करत आहेत. एएनआय वृत्तानुसार, तामिळनाडू पोलिसांनी ७ एआयएडीएमके आमदार आणि अनेक कार्यकर्त्यांना माजी राज्यमंत्री वेलुमणी यांच्या निवासस्थानाबाहेर दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाच्या छाप्याविरोधात निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतले आहे.

यापुर्वीही कारवाई
एआयएडीएमकेचे माजी मंत्री एसपी वेलुमणी यांच्यावर कारवाईची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी जुलैमध्ये प्राप्तिकर विभागाने त्यांचा जवळचा सहकारी चंद्रशेखर यांच्या घरावर देखील छापा टाकला होता. त्यावेळी आयकर विभागाने ६ ठिकाणी छापे टाकल्याचे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या