नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २,७०६ आहे. गेल्या २४ तासांत १,२०९ रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्हिटी रेट सुमारे ०.१७% आणि रिकव्हरी रेट सुमारे ९८.८% आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत २२०.१० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात ६४ हजार २३९ डोस देण्यात आले. यापूर्वी शनिवारी २२६ नवीन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. दुसरीकडे, शुक्रवारी २४३ नवीन रुग्ण आढळले.