37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत अग्नितांडव, होरपळून २७ जणांचा मृत्यू

दिल्लीत अग्नितांडव, होरपळून २७ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज भीषण आगीचा घटना घडली असून तीन मजली कमर्शियल कॉम्प्लेक्समधील इलेक्ट्रॉनिक गोदामाला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील ही इमारत आहे. या इमारतीच्या तिस-या मजल्यावर कोणी अडकून पडले आहे का, याचा शोध रात्री उशिरापर्यंत घेण्यात येत होता. आग विझवण्यासाठी २० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत होरपळून अनेकजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले.

मुंडका परिसरातील इमारतीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने जीवित हानी मोठी झाली. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाचे बम्बही दाखल झाले आणि लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेकांनी जीव वाचविण्यासाठी वरूनच उड्या मारल्या. त्यामुळे जखमी झाले असले, तरी जीव वाचविण्यात यशस्वी झाले. ५० ते ६० लोकांना वाचविण्यात यश आले. मात्र, २७ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

आग लागताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर इमारतीजवळ अनेक लोकांनी गर्दी केली होती. अनेक जण आपापल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. त्यामुळे एकच आक्रोश पाहायला मिळाला. आग नेमकी कशामुळे लागली, हे तात्काळ समजू शकले नाही. दिल्लीच्या अग्मिशमन दलाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, संध्याकाळी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील या ३ मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला आग लागली. लगेचच आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बचावकार्यादरम्यान जवळपास २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर १० जण जखमी झाले.

जखमी संजय गांधी रुग्णालयात
या आगीत अनेकजण जखमी झाले असून, जखमींना ग्रीन कॉरिडॉर तयार करून संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचावकार्य वेगात सुरू करण्यात आल्याने वीजही खंडित करण्यात आली.

अनेकांनी मारल्या
खिडकीतून उड्या
मुंडका येथील तीन मजली इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. आग लागली तेव्हा येथे अनेक लोक उपस्थित होते. त्यावेळी अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आगीने भीषण रुप धारण केले होते. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या