श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून ९७ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी ५.०१ वाजेच्या सुमारात भूकंपाचा झटका बसला.
वृत्तसंस्थेने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कटराच्या पूर्वेपासून ९७ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे ५.१ वाजता भूकंप झाला. महिनाभरापूर्वीही डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
याआधीही जाणवले भूकंपाचे धक्के
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केलवर इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. रविवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास भूकंप झाला होता. यापूर्वी ५ जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ५.९ रिश्टर स्केलवर इतकी नोंदविण्यात आली होती.
सुरतमध्येही जमीन हादरली
यापूर्वी ११ फेब्रुवारीला गुजरातमधील सुरतमध्ये जमीन हादरली होती. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केलवर इतकी नोंदवली गेली. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. भूकंप विज्ञान संशोधनाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये जाणवलेल भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर इतकी होती.