कोची: केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा स्फोटक भरलेले अननस खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतरही देशात हत्तींचे जीव जाण्याचे सत्र सुरुच आहे. गेल्या ३ दिवसांत छत्तीसगडमध्ये ३ हत्तींचा मृत्यू झाल्याची माहती आहे़ या ३ हत्तींपैकी एक हत्तीण २० महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे़ या हत्तींच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समजले नसले तरीही वन अधिका-यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मंगळवारी सुरजपूर जिल्ह्यात वन अधिकाºयांना एका हत्तीचा मृतदेह सापडला होता. ही हत्तीण गर्भवती असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते़ यानंतर बुधवारी याच भागात आणखी एका हत्तीचा मृतदेह वन विभागाच्या अधिका-यांना सापडला. यानंतर गुरुवारी बलरामपूर जिल्ह्यातील गोपाळपूर भागात वन अधिका-यांना आणखी एक हत्ती मृताअवस्थेत आढळला. सध्या सर्व हत्तींचे शवविच्छेदन सुरु आहे. प्रथमदर्शनी हे सर्व हत्ती सदृढ अवस्थेत दिसत होते. त्यामुळे यांच्यावर विषप्रयोग करुन त्यांना मारण्यात आले असावे, असा अंदाज वन अधिकारी अरुण पांडे यांनी व्यक्त केला.
Red More इम्रान खान यांना भारतीय सुरक्षा एजन्सींकडून झटका
प्यालेल्या पाण्याचे नमूणे पाठविले तपासासाठी हत्तींनी जंगलात ज्या ठिकाणी पाणी प्यायले त्या पाण्याचे काही नमुने वन विभागाने तपासासाठी पाठवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून माणूस आणि हत्ती यांच्यात अनेकदा संघर्ष झाल्याच्या घटना छत्तीसगडमध्ये समोर आल्या होत्या. केरळमधील घटनेनंतर सर्व देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे छत्तीसगडमधील हत्तीच्या मृत्यूचे नेमके कारण काय समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.