श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा जवान आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिका-यांनी सांगितले.
शनिवारी रात्रीपासून माछिल सेक्टरमध्ये गस्ती पथकाला संशयस्पद हालचाली दिसल्या. यावेळी दहशतवादी मोठ्या संख्येने घुसखोरीचा प्रयत्न करत होते. या वेळी दहशतवाद्यांवर सैन्याने गोळीबार केला. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यांच्याकडून एक एके ४७ रायफल आणि २ बॅग ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
टीम इंडियाला बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा सल्ला