उमरिया : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यक्रमाला जात असताना झालेल्या बस अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे.
उमरिया जिल्ह्यातील नॅशनल हायवेवरील पुलावर एका दुचाकीला वाचवताना बसचा टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. हा अपघात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यक्रम स्थळापासून ५ किलोमीटर अंतरावर झाला.