23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयबारामुल्ला येथे चकमकीत ३ दहशतवादी ठार

बारामुल्ला येथे चकमकीत ३ दहशतवादी ठार

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती पोलिसांनी दिली. सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर दलाचा एक पोलिसही शहीद झाला.

जम्मू-काश्मीर पोलिस आणि ५२ आरआरच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. सतर्कता बाळगत सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. तर एक पोलिस शहीद झाला आहे. दरम्यान, ठार मारण्यात आलेले तिन्ही दहशतवादी गुलमर्गमध्ये तीन-चार महिन्यांपासून सक्रिय होते आणि ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी यांनी दिली आहे.

याआधी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील सौरा भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी एका पोलिस कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या केली. तर या हल्ल्यात पोलिस कर्मचा-याची ७ वर्षांची मुलगी जखमी झाली. श्रीनगर जिल्ह्यातील सुरा भागात हा हल्ला झाला. सैफुल्लाह कादरी असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. तर दुस-या घटनेत कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या नाका पार्टीवर ग्रेनेडने हल्ला केला. या दोन्ही घटनांमध्ये दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या