21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीययूपीत ३० जण बुडाले

यूपीत ३० जण बुडाले

एकमत ऑनलाईन

बांदा : उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी (ता. ११) दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलिस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी बोट बुडाली. बोटीत ३० हून अधिक लोक होते. आठ जण कसेतरी पोहत निघाले. बोट आणि बाकीचे लोक सापडले नाहीत. स्थानिक गोताखोरांसह एसडीआरएफच्या पथकांना नागरिकांच्या शोधासाठी तैनात केले आहे. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.

मार्कापासून फतेहपूर, प्रयागराजपर्यंत लोक यमुना नदी पार करतात असे सांगितले जात आहे. एकमेव साधन म्हणजे बोट आहे. बोटीत ३० ते ४० लोक नदीच्या एका काठावरून दुस-या बाजूला नेले जातात. रक्षाबंधनानिमित्त बोटीवर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली आहे. योगी यांनी अधिका-यांना घटनास्थळी पाठवले आहे.

गुरुवारी दुपारी ३० हून अधिक जण मार्का येथून बोटीने फतेहपूरकडे जात होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट मध्यभागी अनियंत्रित होऊन उलटली. यानंतर बोटीतील सर्वजण बुडाले. राजकरण पासवान (२८, रा. असोधर बारूई फतेहपूर) व गया प्रसाद निषाद (६०, रा. समगारा बाबेरू) हे पोहून नदीतून बाहेर निघाले. माहिती मिळताच डीएम, एसपी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या