जयपूर : वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी युजी व पीजीच्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. गेल्या वर्षी युजी आणि पीजी मिळून १६६६ मेडिकल विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडले.
यापैकी १६० युजी आणि १५०६ विद्यार्थी पीजीचे आहेत. म्हणजे, सरासरी दरवर्षी ३० युजी व सुमारे ३०० पीजी विद्यार्थी शिक्षण मध्येच सोडत आहेत. हे वास्तव मेडिकल आणि आरटीआय कार्यकर्ते डॉ. विवेक पांडे यांन दाखल आरटीआयतून समोर आले .आरटीआयच्या उत्तरात नॅशनल मेडिकल कमीशनने ही आकडेवारी समोर ठेवली आहे.