25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयबँक कर्मचा-यांना टॉयलेटमध्ये बंद करून ३२ किलो सोने लंपास

बँक कर्मचा-यांना टॉयलेटमध्ये बंद करून ३२ किलो सोने लंपास

एकमत ऑनलाईन

चेन्नई : चेन्नई एका बँकच्या कर्मचा-यांना टॉयलेटमध्ये कोंडून दरोडेखोरांनी कोट्यवधींचे सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बँकेतील ३२ किलो सोने लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चेन्नईतील अरुंबक्कम येथील फेडबँक गोल्ड लोन ऑफीस येथील सोन्यावर दरोडेखोरांनी हात साफ करत पळ काढला आहे. चोरांनी बँकेच्या कर्मचा-यांना शौचालयात बंद करून बँकेतील सोने लंपास केले.

या घटनेची माहिती देताना पोलिस आयुक्त शंकर जिवल यांनी सांगितले की अरुंबक्कम येथील फेडबँक गोल्ड लोनवर दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी स्ट्राँग रूमच्या चाव्या घेऊन कर्मचा-यांना टॉयलेटमध्ये बंद केले. त्यानंतर बॅगमध्ये सोने घेऊन पळ काढला. शाखा व्यवस्थापकानुसार, ३२ किलो सोने चोरीला गेले आहे.

या संदर्भात अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, बँक चोरीत सामील दरोडेखोरांमध्ये एका बँक कर्मचारी असल्याचा पोलिसांनी संशय आहे. पोलिसांचा हा संशय खरा ठरतो की, खोटा हे येत्या काळात समोर येईल. बँकेतील सुरक्षारक्षकांने पोलिसांना सांगितले आहे की दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला पेय दिले होते त्यानंतर तो बेशुद्ध झाला. या संदर्भात अधिक तपास सुरु असून सध्या काहीही सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या