32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीय निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा-गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

 निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा-गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा झाल्याची माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली. याचा विस्तृत घोषवारा देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, जे एकूण जवान करोनाग्रस्त आहेत त्यातील 9158 जवान सीआरपीएफचे, 8934 जवान बीएसएफचे, 5544 जवान सीआयएसएफचे, 3380 जवान आयटीबीपीचे, 3251 जवान एसएसबीचे, 1746 जवान आसाम रायफल्सचे, आणि 225 जवान एनएसजीचे आहेत.

करोनाग्रस्त जवानांचा मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण सीआयएसएफ मध्ये आहे, तर त्या खालोखाल हे प्रमाण आसाम रायफल्स मध्ये आहे असे मंत्र्यांनी सांगितले.

ते म्हणाले की या जवानांच्या उपचारासाठी कोविड उपचार केंद्रे आणि कोविड केअर सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. करोनामुळे मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या नियमीत नुकसानभरपाईसह प्रत्येकी पंधरा लाख रूपयांचा निधी भारत के वीर जवान फंडातून दिला जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ग्रामीण व्यक्तींना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या