26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयदिल्लीत ३५० किलो हेरॉईन जप्त; २५०० कोटींचा अंमलीपदार्थ

दिल्लीत ३५० किलो हेरॉईन जप्त; २५०० कोटींचा अंमलीपदार्थ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करीत तब्बल २५०० कोटी किमतीचे ३५० किलो हेरॉईन आज जप्त केले. दिल्ली पोलिसांची ही मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींपैकी ३ जणांना हरियाणा आणि एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आजवरच्या सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफश केल्याचे आज सांगण्यात आले. हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या सिंडिकेटचा पाकिस्तानशीही संबंध जोडला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की, हे ऑपरेशन अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

एकूण ३५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून एका अफगाण नागरिकाला अटक केली आहे. कंटेनरमध्ये लपवून हेरॉईनचा माल समुद्रमार्गे मुंबईहून दिल्लीला आला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जवळील कारखान्यात ड्रग्स अधिक दर्जेदार बनविले जात होते. त्यानंतर ड्रग्स पंजाबला पाठवले जात होते. तसेच फरीदाबादमध्ये ड्रग्स लपविण्यासाठी भाड्याचे घर घेतले गेले होते. अफगाणिस्तानात बसलेले आरोपी हे ऑपरेट करत होते, असे पोलिसांनी सांगितले.

असे उघडकीस आले रॅकेट
भारतात वेगवेगळ्या देशांतून समुद्रमार्गे ड्रग्जची तस्करी होत असून त्यातील बहुतांश ड्रग्ज हे दिल्लीत येत असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ३५४ किलो अंमली पदार्थ जप्त केले. हे अफगाणिस्तानवरून आणल्याचे उघड झाले आहे. अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींपैकी २ पंजाबचे असून एक काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आहे.

विदेशी नागरिकालाही अटक
दिल्लीत ड्रग्जच्या तस्करीचे प्रमाण वाढत चालले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोहान्सबर्गला चाललेल्या एका नागरिकाला पोलिसांनी संशयावरून अटक केली. जाम्बियाचा रहिवासी असलेल्या हा नागरिक तस्कर असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. या नागरिकाच्या पोटात ड्रग्ज कॅप्सूल असल्याचे एक्सरेमधून दिसून आले.

दोन्ही डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या