गंगटोक : सिक्कीममध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, शेकडो पर्यटक बर्फात अडकले आहेत. या घटनेनंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले असून, भारतीय लष्कराने खास पर्यटकांनी वाचविण्यासाठी ऑपरेशन हिमराहट सुरू केले आणि देवदूत बनून धावून जात तब्बल ३७० पर्यटकांना वाचविले.
नाथुला आणि त्सोमगो भागात हे पर्यटक अडकले होते. पूर्व सिक्कीम भागात ही बर्फवृष्टी झाली. त्यात हे पर्यटक अडकले होते. मात्र, भारतीय लष्करी जवानांनी त्यांना वाचविले.