36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ३८ हजार ६१७ नवे बाधित

देशात ३८ हजार ६१७ नवे बाधित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून कोरोनावर मात करणा-यांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. रोज आढळणाºया कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणा-यांची संख्या ही अधिक असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्ये ४४ हजार ७३९ जणांनी कोरोनावर मात केली असून, ३८ हजार ६१७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ४७४ रुग्णांचा या कालावधीत मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ८९ लाख १२ हजार ९०८ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात ४ लाख ४६ हजार ८०५ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ८३ लाख ३५ हजार ११० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३० हजार ९९३ झाली आहे. देशात १२,७४,८०,१८६ नमुन्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे. यापैकी कालण (१७ नोव्हेंबर) रोजी ९ लाख ३७ हजार २७९ नमुने तपासण्यात आले. आरसीएमआरकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाºयांची संख्या रोज अधिक आढळत आहे. नक्कीच ही दिलासादायक बाब असली, तरी देखील कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. सणासुदीचा काळ असल्याने कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचेही सांगितले जात आहे.

मोदींचा ‘विकास की विनाश’?

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या