23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयदेशात ३८ हजार नवे रुग्ण

देशात ३८ हजार नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या अजुनही कमी जास्त होत आहे. रविवारी देशात ३८ हजार १७६ नवीन रुग्ण सापडले. तर ३५ हजार ९४५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. काल दिवसभरात देशात कोरोनामुळे ४११ जणांचा मृत्यू झाला. तर सक्रीय रुग्णांमध्ये २ हजार ११२ जणांची वाढ झाली. सध्या देशातील ११ राज्यांमध्ये प्रत्येक दिवशी ५०० हून जास्त रुग्ण सापडत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामचा समावेश आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात ६ हजार ८४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ इतकी झाली आहे. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन ९४ हजार ९८५ इतकी झाली. दिवसभरात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे होणाºया रुग्णांची संख्या ६० लाख ३५ हजार २९ इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे.

अखेर येदियुरप्पा यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या