26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीय२४ तासांत ३८,०७९ नवे रुग्ण

२४ तासांत ३८,०७९ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाºया नवीन कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारांच्या आत नोंदली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ३८ हजार ७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५०६ जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत ४३ हजार ९१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा देशाचा रिकव्हरी रेट ९७.३१ टक्केंवर पोहचला आहे.

देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.१० टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट १.९१ टक्के इतका आहे. मागील २६ दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.

इंधन तुपापेक्षाही महागले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या