21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील ४ कोटी लोकांना एकही डोस नाही

देशातील ४ कोटी लोकांना एकही डोस नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आतापर्यंत देशात २०० कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि बूस्टर डोस समाविष्ट आहेत. मात्र, एक आकडा सरकारची चिंता वाढवू शकतो. १८ जुलैपर्यंत देशातील सुमारे ४ कोटी लोकसंख्येने पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतीच सामायिक केली आहे.

१८ जुलैपर्यंत सुमारे ४ कोटी लाभार्थ्यांना कोरोना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. जेव्हा की केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे. आतापर्यंत प्रशासित एकूण २०१ कोटींहून अधिक डोसपैकी ९७ टक्के हून अधिक लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर लस मोफत दिली गेली आहे. अलीकडेच केंद्र सरकारने सर्व पात्र प्रौढांना मोफत बूस्टर डोस देण्यासाठी ७५ दिवसांची विशेष मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ६.७७ कोटी प्रौढांनी बूस्टर डोस घेतला आहे. या विशेष मोहिमेपूर्वी यावर्षी १६ मार्चपासून सरकारी कोरोना लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंट-लाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांना डोस मोफत उपलब्ध होते.

७५ दिवसांच्या मोहीमेतून होणार फायदा
१८ जुलैपासून सरकारी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील सर्व लोकांना प्रतिबंधात्मक डोस देण्यासाठी विशेष ७५ दिवसांची मोहीम सुरू झाली. कोरोना लसीकरण अमृत महोत्सव या मोहिमेचा उद्देश पात्र लोकांमध्ये कोरोना सावधगिरीच्या डोसचा प्रचार करणे हा आहे.

९८ टक्के प्रौढांना मिळाला पहिला डोस
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सरकारच्या आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून आयोजित केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांच्या मते, भारतातील ९८ टक्के प्रौढ लोकसंख्येला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या