24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयजम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले ४ ड्रोन

जम्मूत वेगवेगळ्या ठिकाणी दिसले ४ ड्रोन

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलिकडून ड्रोन येण्याच्या घटना कमी होत नसल्याचे दिसत आहे. आता आणखी चार संशयास्पद ड्रोन सापडले आहेत. जम्मू आणि सांबा सेक्टरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ४ ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. याआधी चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी जम्मू एअरफोर्स स्टेशनचा दौरा केल्यानंतर काही तासातच पुन्हा ड्रोन दिसल्याची घटना घडली होती.

याआधी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ड्रोन दिसले होते. लष्कराच्या जवानांना बुधवारी रात्री ९ वाजता पल्लनवाका सेक्टरमध्ये क्वाडकॉप्टर पाहिले. जेव्हा सैनिकांनी क्वाडकॉप्टरला पाडण्यासाठी गोळीबार केला तेव्हा ते पाकिस्तानच्या दिशेने परत गेले. या भागातील माहिती घेण्यासाठी तो ड्रोन पाठवण्यात आला होता. तसेच, जम्मूत आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास एक संशयास्पद ड्रोन दिसला. सीमा सुरक्षा दलाने यावर तात्काळ कारवाई करत ५ ते ६ राउंड फायर केले. त्यानंतर ड्रोन पाकिस्तानच्या दिशेला परतला. बीएसएफच्या सैनिकांना २०० मीटर उंचीवर लाल प्रकाश दिसला होता.

देशात ३८ हजार ९४९ नवे रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या