नमक्कल : तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात एका फटाका दुकानदाराच्या घरात स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत फटाका दुकानाचा मालक आणि तीन महिलांसह चौघे ठार झाले, तर आणखी चौघे जखमी झाले आहेत. दुकानातील फटाके घरात ठेवले होते.
या फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात फटाका दुकान मालकाच्या घरासह नजीकच्या घरांचेही नुकसान झाले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या प्रयत्नांतून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.