22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयदेशात ४ हजार ९४९ नवे रुग्ण

देशात ४ हजार ९४९ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात ५ हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ३६९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी ४५ लाख ४ हजार ९४९ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजार ३४७ वर पोहोचली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ३ लाख ५० हजार ४६८ चाचण्या झाल्या आहेत. जर आपण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण आकडेवारी पाहिली तर ही संख्या ५ लाख २८ हजार १८५ वर पोहोचली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या