36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीय४० लाख ट्रॅक्टरसह संसदेवर धडकणार; टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

४० लाख ट्रॅक्टरसह संसदेवर धडकणार; टिकैत यांचा केंद्र सरकारला इशारा

एकमत ऑनलाईन

जयपूर : केंद्र सरकारने केंद्रीय कृषि कायदे मागे घेतले नाहीत, तर यावेळी ४ लाख नाही, तर तब्बल ४० लाख ट्रॅक्टरसह संसदेवर धडक देऊ, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला. राजस्थानमधील सीकर येथे आयोजित शेतकरी रॅलीत ते बोलत होते. आता पुढचे आव्हान संसदेवर मार्च काढणे हे आहे. कृषि कायदे मागे न घेतल्यास संसदेवर धडकणार, असे टिकैत म्हणाले. यासोबतच त्यांनी गुजरातदेखील मोदी सरकारच्या बंधनात अडकले आहे. त्यांनाही स्वतंत्र करायचे आहे. कारण तेथील लोक बंधनमुक्त होऊ इच्छितात. त्यांच्यावर खटले चालतील. त्यांना तुरुंगात टाकतील.

मात्र, काहीही झाले, तरी आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी सांगितले. आगामी काळात शेतक-यांची एक नजर शेतावर, दुसरी नजर दिल्लीतील आंदोलनावर आणि तिसरी नजर संयुक्त किसान मोर्चावर राहावी. केंद्र सरकार शोध केंद्रांचे म्हणणे ऐकत नाही. त्यामुळे आगामी काळात संसदेजवळ कृषि संशोधन केंद्र सुरू करावे. संसदीय समिती स्थापन करावी आणि तेथे शेती करून विविध पिके घ्यावीत, जेणेकरून फायदा आणि नुकसान समिती पाहू शकेल आणि त्या आधारे शेतक-यांच्या पिकांना पैसे मिळतील, असा टोलाही टिकैत यांनी लगावला.

एलएसीवरील सैन्य माघार हा दोन्ही देशांचा विजय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या