16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयकॉंग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, प्रियंका गांधींसह अशोक चव्हाणांचा समावेश

कॉंग्रेसचे ४० स्टार प्रचारक; सोनिया, प्रियंका गांधींसह अशोक चव्हाणांचा समावेश

एकमत ऑनलाईन

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. गेल्यावेळी राज्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळीदेखील गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेदेखील तयारी सुरू केली असून, काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ४० जणांचा समावेश आहे.

या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, द्विग्विजय सिंग, मल्लिकार्जुन खरगे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हैय्या कुमार, भुपेद्रसिंग हुड्डा या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश करण्यात आला आहे.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्यावेळी भाजपाने गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळीदेखील भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे काही नेते गुजरातमध्ये प्रचाराला जाणार आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या