25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeउद्योगजगतधनत्रयोदशीच्या दिवशी ४० टन सोने विक्री

धनत्रयोदशीच्या दिवशी ४० टन सोने विक्री

एकमत ऑनलाईन

मुंबई : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर नागरिक सोने खरेदी करत असतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या विक्रीत तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात २० हजार कोटी रुपयांची सोने खरेदी झाली आहे. ही आकडेवारी इंडिया बुलियन अँण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ने दिली आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, देशभरात यंदाच्या धनत्रयोदशीला सोन्याची तब्बल ४० टन विक्री झाली आहे आणि याची किंमत बाजारभावानुसार, २०,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी आयएएनएसला सांगितले की, गेल्या वर्षी सुमारे १२,००० कोटी रुपयांची सोने विक्री झाली होती़ मात्र, यंदा हा आकडा २० हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे.

मेहता यांनी सांगितले की, गेल्या वर्षी धनत्रयोदशीला ३० टन सोने विक्री झाली होती़ तर यंदा ४० टन विक्री झाली आहे. सोन्याच्या विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, किंमतीनुसार ही वाढ ७० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांत सोने खरेदी होत नव्हती आणि त्यामुळेच यंदा मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना सोन्याचे दागिने खरेदी करता आले नाही. आता सर्व व्यवहार सुरू झाल्याने तसेच धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी केले आहेत.

सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्यावर घसरण
सोन्याच्या भावाने ५६,००० रुपयांचा उच्चांक गाठला होता आणि त्यानंतर भावात घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच नागरिक सोन्यात गुंतवणूक करत आहेत. तसेच यंदा ज्वेलर्सकडूनही आकर्षक आॅफर्स दिल्या गेल्या ज्यामुळे नागरिक सोने-चांदी खरेदी करण्याकडे जास्त प्रभावित झाले.

देशात दोन वेळा दिवाळी साजरी
देशात धनत्रयोदशी दोन वेळा साजरी करण्यात आली. काही ठिकाणी गुरुवारी धनत्रयोदशी साजरी केली़ यामुळे सोने खरेदी आणखी वाढली. आयबीजेएच्या मते, शुक्रवारी देशभरातील स्पॉट मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्ध सोन्याची सरासरी किंमत ५०,८४९ रुपये प्रति १० ग्रॅम (बिना जीएसटी) होता. तर आदल्या दिवशी हाच भाव ५०,७०२ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.

सोने दरातील चढउतार
२२ कॅरेट शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव ५०,६४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. जो एक दिवसापूर्वी ५०,४९९ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तर चांदीचा भाव ६२,७०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. जो गेल्या सत्रात ६२,७९७ रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. देशातील सर्वात मोठ्या वायदा बाजार मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर संध्याकाळी ६.४२ वाजता डिसेंबर एक्सपायरीसाठी ३२५ रुपये म्हणजेच ०.६४ टक्के इतकी वाढ होत ५०,९२५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. तर एमसीएक्सवर डिसेंबर एक्सपायरीसाठी चांदीच्या भावात ९७४ रुपये म्हणजेच १.५५ टक्के तेजीसह ६३,७१३ रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

परकीय चलनात वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या