22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeराष्ट्रीयचीनला ४० हजार कोटींचा फटका

चीनला ४० हजार कोटींचा फटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिवाळी अवघ्या महिनाभरावर आली आहे. करोना संकट आणि निर्बंधामुळे अजूनही बाजारात लगबग सुरु झालेली नाही. तरीही याच दिवाळीत चीनचे मात्र दिवाळे निघाले आहे. दिवाळीत पाच रुपयांच्या फुलबाज्यांपासून हजारो रुपयांचे चिनी फटाके बाजारात पोहोचले नाहीत. गलवान प्रकरणांनंतर केंद्र सरकारने चिनी मालाची कोंडी केली आहे. कठोर निर्बंधांमुळे चीनला जवळपास ४० हजार कोटींचा जबरदस्त दणका बसला आहे.

भारतात फटाक्यांची निर्मिती होत असली तरी मागील काही वर्षात बाजारपेठेवर चिनी फटाक्यांनी पकड मिळवली होती. स्वस्त आणि फॅन्सी असलेल्या या फटाक्यांची बाजारात क्रेझ होती. मात्र आता हेच फटाके आता चीनला दणका देणार आहेत. यंदा चिनी फटाक्यांची आयात कोंडी करण्यात आली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात जवळपास ४० हजार कोटींची चिनी फटक्यांची उलाढाल आहे. मात्र गलवान खो-यात झालेल्या लष्करी दगा फटक्यानंतर भारताने चिनी वस्तूंच्या आयातीवर कडक निर्बंध लादले आहे.

चिनी आयातीवर कडक निर्बंध
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, चीनमधून केवळ फटाकेच नाही तर सजावटीचे सामान, देवदेवतांच्या मूर्ती, विद्युत रोषणाईची उपकरणे भारतीय बाजारात दाखल होतात. मात्र यंदा या वस्तू आल्या नाहीत.

भारतीय नागरिक आणि सरकार अशी दोन्हीकडून कोंडी
एकीकडे भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार घातला आहे. तर दुसरीकडे सरकारने देखील चिनी मालाची कोंडी केली आहे. त्यामुळे चीनी कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

गलवान खो-यातील संघर्ष भोवला
गलवान खो-यातील चिनी लष्करच्या हरकतीने आशियात चीनची बदनामी झाली आहे. त्याआधी कोरोना विषाणूची निर्मिती केल्याच्या संशयावरून जगभरात चीनवर बहिष्कार घालण्यात आला आहे.

भारतीय कंपन्यांना निर्यातीची मोठी संधी
निर्यातीची संधी भारतीय कंपन्यांना उपलब्ध झाली आहे. भारतीय मालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वाढली आहे. देशी कलाकारांची कलाकुसर, शोभेच्या वस्तूंना पाश्चिमात्य बाजारात मागणी आहे.

परभणी जिल्ह्यात पंचवीस नवे रुग्ण; एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या